कारकीर्द घडविण्याची संधी

नोकरीच्या संधी

डेली कलेक्शनसाठी एजंट

संस्थेचा व्यवसाय वाढीसाठी सेवा

थकबाकी वसुलीसाठी सेवा

संस्थेवर विषेश सेवेसाठी अधिकृत निवड

 

नोकरीच्या संधी

जेंव्हा मुख्य शखा व इतर शाखांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते तेंव्हा सुयोग्य व सक्षम कर्मचारी भरती केली जाते. भरतीची प्रक्रिया ही प्रत्येक प्रकारच्या भरतीसाठी वेगवेगळी आहे त्याची पुर्वनियोजित पद्धती आहे. त्यामध्ये लेखा परिक्षा, संस्था संबंधित व्यक्तिंची ओळख, मुलाखती वगैरेंचा समावेश आहे.

Top

  डेली कलेक्शनसाठी एजंट

डेली कलेक्शनसाठी एजंट ही पोस्ट आमच्या काही शाखांसाठी असतात. शाखेपासून दूर रहाणारे रहिवासी किंवा महिला छोटे उद्योजक, दुकानदार यांना सोय असावी म्हणून ही गरजेची आहे. सदर शाखांतून रितसर पुर्वनियोजित पद्धतीने ही भरती केली जाते. त्यामध्ये लेखा परिक्षा, संस्था संबंधित व्यक्तिंची ओळख, मुलाखती वगैरेंचा समावेश आहे.

Top

  संस्थेचा व्यवसाय वाढीसाठी सेवा

संस्थेचा बॅंकींग व्यवसाय वृद्धीसाठी काही शखांतून अशाप्रकारच्या संस्थेच्या ध्येय पूर्तीसाठी सक्षम व्यक्तिंची निवड केली जाते. या निवडीमध्ये संस्थेची व्यवसाय वृद्धी हाच प्रत्यक्ष विषय असल्यामुळे यात दोघांचाही म्हणजे संस्थेचा व ही सेवा देणारी व्यक्ती यांचा फायदा होऊ शकतो. डेली कलेक्शनसाठी एजंट जसे ठेवींवर काम करतात तसेच संस्थेसाठी कर्ज वितरणाचा व्यवसाय आणण्यासाठी या सेवेचा उपयोग होतो.

Top

  थकबाकी वसुलीसाठी सेवा

आमचा थकबाकीचा आकडा हा एकदम कमी आहे व त्यासाठी आम्ही नेहमीच संस्थापक, कर्मचारी व आमचे मौल्यवान ग्राहक यांचे आभारी आहोत. तरीही काही कर्ज प्रकारात, जर का गरज भासली तर, आम्ही व्यक्तिचा पूर्वानुभव लक्षात धेऊन थकबाकी वसुली सेवेसाठी निवड करतो.

Top

  संस्थेवर विषेश सेवेसाठी अधिकृत निवड

आम्ही एक प्रगतीपथाकडे झेप घेणारी पतसंस्था आहोत व तसा आमचा इतिहास आहे. 21व्या शतकातील व्यवसाय व्यवस्थापनाला अनुसरून आम्ही समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त व्यक्तिंच्या सेवा घेतो. संस्थेसाठी तांत्रीक मदत, व्यवस्थापन मदत, सरकार दरबारी मदत वगैरे. यासाठी काही व्यक्तिंची निवड करून ते संस्थेच्या पटावर असतात व गरजेप्रमाणे त्यांच्या सेवा योग्य मोबदला या तत्वावर घेतल्या जातात.

इथे विषेश उल्लेख करणे महत्वाचे आहे की आमच्या संचालक मंडळातपण एक्स्पर्ट संचालक या शिर्षकाखाली विना स्वेच्छेने मोबदला सेवा देणारे संचालक आहेत व तशीच सेवा देणारे लेखापरिक्षक, वकील व इतर सल्लागार आहेत.

Top

   


       






















A