शंका व समाधान

 
प्रश्न उत्तरे
क्रेडिट सोसायटी ही रिझर्व्ह बॅंकेच्या अधिपत्यात काम करते का? क्रेडिट सोसायटी ही पुर्णपणे डिपार्टमेंट ऑफ को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या अधिपत्यात काम करते.
बचत खाते उघडण्यासाठी सभासद होणे गरजेचे आहे का? होय, आमच्याकडे बचत खाते किंवा इतर कोणतेही खाते उघडण्यासाठी कमितकमी नाममात्र सभासद होणे गरजेचे आहे.
सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ओळखीची गरज आहे का? होय, आमच्याकडे सभासद होण्यासाठी सध्याच्या दोन (2) सभासदांच्या संदर्भांची व सभासद अर्जावर त्यांची स्वाक्षरी करण्याची गरज आहे.
सभासद होण्यासाठी इतर कोणत्या प्रकारच्या माहितीची गरज आहे का? सभासद होण्यासाठी पुर्णपणे भरलेला अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहात्या घराच्या पत्याचा पुरावा व सभासद होण्यासाठीची रक्कम यांची गरज आहे.
ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी काही सवलत आहे का? ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी आपल्या ठेवींच्या खात्यातून वाढीव व्याज दिले जाते. कृपया ठेवींचा प्रकार पहावे.
कर्ज घेण्यासाठीपण अगोदर सभासद होणे गरजेचे आहे का? होय, कर्ज घेण्यासाठी व कर्जासाठी अर्ज करण्याआधीपण कमीतकमी नाममात्र सभासद होणे गरजेचे आहे का? सभासद होण्यासंबंधीची माहिती वर दिली आहे.
मला प्राप्त झालेला इतर बॅंकेचा धनादेश (मिळालेला इतर बॅंकेचा चेक) मी आपल्याकडील माझ्या खात्यात भरू शकतो का? होय, रु.50,000/- पर्यंतचा तुम्हाला प्राप्त झालेला इतर बॅंकेचा धनादेश (मिळालेला इतर बॅंकेचा चेक) तुम्ही आमच्याकडील तुमच्या खात्यात भरू शकता व रु.50,000/- वरील चेक हा तुम्ही कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित या नावाने घेऊन तुम्ही आमच्याकडील तुमच्या खात्यात भरू शकता.
आपल्या संस्थेत सभासद झाल्यावर मी लगेच कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकतो का? नाही, कर्ज घेण्यासाठी आपण, आमच्या संस्थेत सभासद झाल्यावर आपण 6 महिन्या नंतर कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकता.
मी आपल्या कोणत्याही शाखेत जाऊन, एका कोणत्याही शाखेतील माझ्या खात्यात पैसे भरू शकतो का? होय, आपण आमच्या कोणत्याही शाखेत जाऊन, एका कोणत्याही शाखेतील आपल्या खात्यात पैसे भरू शकतो.
आपल्याकडे मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ठेवण्यासाठी सेफ डिपॉझीट लॉकर आहेत का? होय, आमच्याकडे मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ठेवण्यासाठी सेफ डिपॉझीट लॉकर आमच्या मुख्य शाखेत आहेत.

 

वरती


       






















A