आमची माहिती

परिचय

स्थापना व प्रथम संस्थापक

उद्दिष्ट

संचालक मंडळ

प्रगतीतील मैलांचे दगड

आमची वैशिष्ठ्ये

आमचा दृष्टीक्षेप

आमचे मिशन

नोंदणी व अधिकृतता

समाजाचे देणे


37वा वर्षिक अहवाल, 2017-18
परिचय:

कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी

गौर कशाच्या पावलाने आली
सोन्या-रूप्याच्या पावलाने आली.

खरंच कांचनगौरी ही अशीच डोंबिवली शहराच्या घराघरातून सोन्या-रूप्याच्या पावलांनी प्रवेश करती झाली. या पतपेढीला आता 35 वर्षे झाली तिचे हे रूप नविन शाखांनी बहरत आहे.

बिजा हवी निगराणी हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ कष्टाचा पाझर

याच भावनेने कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीचा पाया घातला गेला.

वरती

31/07/2022 तारखेची आर्थिक स्थिती

सभासद संख्या

भाग भांडवल

स्वनिधी

एकूण ठेवी

एकूण कर्जे

एकूण गुंतवणूक

निव्वळ नफा

थकबाकी

राखीव निधी

लाभांश

17226 अधिक

4.06 करोड

8.12 करोड

126.51 करोड

73.27 करोड

47.66 करोड

4.90 करोड

48.78%

3.79 करोड

@ 5%

वरती

स्थापना व प्रथम संस्थापक:

गोष्ट आहे सन 1982 ची. कै. श्री. अनंतराव कुलकर्णी, कै. श्रीमधुकरराव भागवत, श्री. रामभाऊ शेंबेकर आणि श्री. हरिभाऊ बापट अशी डोंबिवलीकर विचारवंत मंडळी सहकार भारतीच्या सांगली येथील संमेलनास गेली होती. संमेलन आटपून परतत असताना गाडीमध्ये झालेल्या चर्चेतून डोंबिवली ग्राहक संघाच्या महिलांना एकत्रित करून महिलांची एक संस्था स्थापन करावी असा विचार मांडण्यात आला.

डोंबिवली ग्राहक कल्याणकारी संस्थेच्या 16 शाखांमधून कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना एकत्र करून सभासद जमवण्याच्या कामाला सुरवात झाली एकत्र बैठका घेण्यात आल्या आणि पतपेढी स्थापन करण्याचा विचार पक्का झाला. त्या दॄष्टीने भाग-भांडवल गोळा करून कामाला सुरवात झाली. सर्व थोरांच्या सहकार्याने पतपेढी नावारूपाला आली. दिनांक 2 मे 1982 (अक्षय तॄतीया) या मुहुर्तावर कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी (मर्यादित) अशा नामकरणाने कामाला सुरवात झाली.

महिलांनी महिलांसाठी महिलांद्वारे चालवलेली ही संस्था प्रथम कै. श्रीमधुकरराव भागवत व श्रीमती मीरातार्इ भागवत यांच्या घरात कार्यान्वित झाली. दोन कर्मचारी घेऊन पतपेढीच्या कामाला सुरूवात झाली.

11 जणींचे संचालकमंडळ पदावर आरूढ झाले आणि श्री. इंदुतार्इ बापट यांच्या मार्गदर्शनावर काम धडाडीने पुढे सरकले. खरंतर आर्थिक पतसंस्थेत काम करणे अत्यंत कठीण आहे. कुठल्याही राजकीय वा समाजातील प्रतिष्ठा किंवा सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप करून न देता नियमांचे काटेकोर पालन करून प्रगती करणे सोपे नाही. पतपेढीला सहकारी खात्याची अनेक बंधने पाळावी लागतात परंतु सर्वांवर मात करीत पतपेढीने कायम अ ’वर्ग टिकवला आहे. आज कांचनगौरीने सर्व सामान्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कांचनगौरी पतपेढी ही जणू एकच कुटुंब आहे. हीच भावना सुरूवातीपासूनच संचालक मंडळाने जोपासली आहे आणि त्यांना सर्व कर्मचारी सल्लागार आणि हितचिंतकांनी वेळोवेळी सहकार्य करून पतपेढीचा चढता आलेख ठेवला आहे. संचालक मंडळाने कर्ज घ्यायचे नाही हा पहिला नियम आजपर्यंत संचालक भगिनींनी पाळला आहे. कुठलाही मिटींगभत्ता सुद्धा घेत नाहीत. सगळे काम स्वेच्छेने.

2 मे 2006 ते 2 मे 2007 या रौप्यमहोत्सवी वर्षात पतपेढीने अनेक उपक्रम राबविले होते. सौ. मार्इ गोरेगांवकर व श्री. भार्इ गोरेगांवकर यांच्या सहकार्याने सभासदांसाठी कॅल्शिअम टेस्ट, आरोग्य शिबिर, आयुर्वेदिक उत्पादन कार्यशाळा मुलांसाठी बुध्यांक चाचणी शिबिरे आयोजीत करण्यात आली. रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वर रूपेरी ’हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.

अवघ्या 600 सभासदांच्या सहयोगाने सुरू झालेली पतपेढीने आज 18209 सभासदांची आघाडी मारली आहे. पुरूष नाममात्र सभासदांनासुध्दा कांचनगौरी कर्ज देते. यशाचा सुंदर आलेख पाहता आज पतपेढी मुख्य कार्यालयाशिवाय 12 शाखांमध्ये कार्यान्वित आहे. विस्ताराच्या कक्षा रूंदावत डोंबिवलीच्या पूर्व, पश्चिम तसेच टिटवाळा, घोटसर्इ, बदलापूर, ठाकुर्ली, निळजे, वाशिंद असा कांचनगौरीचा विस्तार झाला आहे.

उगमाशी नदी एका झऱ्याप्रमाणे वाहते. डोंगर-दऱ्या पार करून तीचे रूपांतार नदीत होते आणि किनाऱ्यावरील रहिवाश्यांना ती आधारभूत ठरते असेच थोडेसे कांचनगौरी पतपेढीचे आहे असे म्हणावयास काहिच हरकत नाही.

कुटुंब प्रमुख चांगला असेल तर सर्वकुटुंब सुखी होते. स्त्रीला दुहिता म्हणतात. दोन घराण्यांचे हित सांभाळणारी दुहिता. घर संसार व पतपेढीचा कार्यभार सर्वमहिला समर्थपणे सांभाळत आहेत. पतपेढीच्या व्यवस्थापिका सौ. जोत्स्ना भावे सर्वकार्यभार पूर्णपणे सांभाळत आहेत. सर्व कर्मचारीवर्ग आपापल्या जवाबदाऱ्या समर्थपणे, विश्वासाने पार पाडत आहेत. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात कांचनगौरी महिला पतपेढीत अभिमानाने, विश्वासाने यशस्वीपणे उभी आहे.

वरती

उद्दिष्ट:

अल्प उत्पन्न गटासाठी पतपेढी मोठी आधारच ठरली. घरकाम करणाऱ्या, भाजीवाल्या, सफार्इ कामगार कितीतरी महिलांनी सावकारी पाशातून सुटका करून घेतली. त्यांना सहकार्य कांचनगौरीने केले. जात-पात गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता योग्य त्या कागदपत्रांचा अभ्यास करून कर्ज दिली जातात व त्याची योग्यती परतफेड होते की नाही याचे वेळोवेळी निरीक्षण करण्यात येते.

प्रथम प्रत्येकास रू.2000/- एवढे कर्ज दिले जात होते. आता प्रत्येकास रू.40 लाख पर्यंतचे कर्ज विविध कारणांसाठी दिले जाते. शिक्षणासाठी कर्ज घेऊन कितीतरी विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षण घेत आहेत. गॄहतारण कर्ज घेऊन कित्येकांनी आपली स्वप्ने साकार केली आहेत. सोने तारण कर्ज घेऊन सभासदांनी आपल्या तात्काळ गरजा भागवल्या आहेत,

वरती

संचालक मंडळ:
   

नाव

पद  
  सौ. उर्मिला प्रभुघाटे

अध्यक्ष

संचालक 1995 पासून
सहकार भारती व इतर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग
  सौ. सविता कुलकर्णी उपाध्यक्ष संचालक 2005 पासून
  सौ. संगीता ताम्हणकर

 

संयुक्त सचीव संचालक 2004 पासून
या अगोदर उपाध्यक्ष,
संयुक्त सचीव या अनेक पदांवर सफल जबाबदारी कामगारी
  सौ. दीपाली गोडबोले संचालक संचालक 1982 ते 1986 आणि
2000 पासून

या अगोदर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचीव या अनेक पदांवर सफल जबाबदारी कामगारी
  सौ. शैलजा खंदारे संचालक संचालक 1995 पासून
या अगोदर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचीव या अनेक पदांवर सफल जबाबदारी कामगारी
  सौ. सीमा पाटणकर संचालक संचालक 2005 पासून
या अगोदर सेक्रेटरी पदावर सफल जबाबदारी कामगारी
  सौ. विनया करंबेळकर संचालक एक्स्पर्ट संचालक 2011 पासून
  सौ. रेखा दुधे संचालक संचालक 2006 पासून
या अगोदर संयुक्त सचीव या पदावर सफल जबाबदारी कामगारी
  सौ. लक्ष्मी अय्यर संचालक संचालक 2005 पासून
  सौ. अंजली गोरे संचालक संचालक 2011 पासून
  सौ. उषा बोबडे संचालक संचालक 2007 पासून
  सौ. माधुरी जोगी संचालक संचालक 2005 पासून
  सौ. अपर्णा पाठक संचालक संचालक 2016 पासून
  कु. सुधा अय्यर एक्स्पर्ट संचालक एक्स्पर्ट संचालक 2011 पासून
  सौ. संगीता फाटक एक्स्पर्ट संचालक एक्स्पर्ट संचालक 2016 पासून

वरती

प्रगतीतील मैलांचे दगड:

7 मार्च 1982: रामनवमी या शुभदिनी TNAKYNRSR206 या नोंदणी क्रमांकाने सफल नोंदणी.

7 मार्च 1982: श्री. व सौ. भागवत यांच्या घरून पतसंस्थेचे कामकाज सुरू.

6 ऑगष्ट 1983: वरदायिनी या पहिल्या शाखेची स्थापना.

20 डिसेंबर 1992: वैभवगौरी या दुस-या शाखेची स्थापना.

1994 ते 1995: विवेक व्यासपीठ या नामचीन संस्थेकडून महिलांसाठी कार्य करणारी पतसंस्था म्हणून सन्मानित.

3 मे 1995: वरदलक्ष्मी या शाखा नंबर तीनची स्थापना.

1 एप्रील 1995: शाखांचे कामकाज, ग्राहकांच्या सोईसाठी वाढीव सेवा म्हणून, सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळेत चालू केले.

7 ऑगष्ट: उमेशनगर या चौथ्या शाखेची स्थापना.

2003-04: ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची संस्थेला भेट. या भेटीत त्यांनी संस्थेच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले.

25 फेबृवारी 2005: मुख्य शाखा संगणकीकृत.

1 जानेवारी 2006: विष्णूनगर शाखा संगणकीकृत.

2 फेबृवारी 2006: वैभवगौरी शाखा संगणकीकृत.

2 मे 2010: मुख्य शाखेचे स्वत:च्या मालकीच्या वास्तूत स्थलांतर.

12 जुलै 2012: महाराष्ट्र राज्यसरकार आम्ही असे दोघांनी मिळून सहकार व्यवसाय जत्रेचे अयोजन.

वरती

आमची वैशिष्ठ्ये:

सर्व आधुनिक सोईयुक्त मालकीच्या ऐसपैस जागा.

नम्र तत्पर सेवा.

उच्चशिक्षीत संचालक मंडळ व प्रशिक्षीत कर्मचारी.

लेखापरिक्षणात अ शेरा

आम्ही टी.डी.एस. वळते करत नाही.

सर्व शाखा पूर्णपणे संगणिकृत.

थकबाकी 1.95%

सर्वांसाठी सभासदत्व.

ठेवींवर जास्ती व्याजदर.

कर्जांसाठी कमी व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% जास्तीचे व्याजदर

संस्थेला वाढता नफा व भागधारकांना 14% लाभांश

वरती

आमचा दृष्टीक्षेप:

सक्षम स्त्रिया व सुशिक्षीत मुलांनी युक्त अशा समाजाची निर्मिती करणे ही आमची दुरदृष्टी आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी बनवून सद्दयकाळातील आव्हाने पेलविण्यास समर्थ करणे हे होय.

वरती

आमचे मिशन:

वेळेवर कर्जाची उपलब्धी: पात्र व गरजू व्यक्तिंना शिक्षण, घरखरेदी, व्यवसाय या साठी वेळेवर कर्जाची उपलब्धी करणै.

शैक्षणिक प्रगतीला सहाय्य: स्कॉलरशिप व कर्जाच्या सहाय्याने शैक्षणाला प्रगतीला सहाय्य करणे.

सामाज्याच्या प्रगतीसाठी अर्थसहाय्य: वृक्षारोपण, उर्जा संरक्षण, पावसाच्या पाण्याची साठवण अशा सामाजिक कार्यासाठी आर्थिक सहाय्य.

आदिवासी कल्याणकारी कार्य: आदिवासी लोकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या सहाय्याने व आर्थिक मदतीने सक्षम करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.

उत्तम कार्यपद्धतीने सर्वदूरपोहोचणे: सुकर बॅंकिंग सेवा देऊन अखंड महाराष्ट्रभर कार्य करावे. हे करीत असाताना स्वच्छ कार्यपद्धती, उत्तम ग्राहकसेवा व आधुनिक तंत्रज्ञान यांची  कास धरावी.

वरती

नोंदणी व अधिकृतता:

नोंदणी क्रमांक TNAKYNRSR206 दि. 6 मार्च 1982.

वरती

समाजाचे देणे:

समाजाचे देणे या भावनेने, दे वर्षी, आमच्या नफ्यातील काही भाग हा समाजाच्या गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी केला जातो. त्यामध्ये स्कॉलरशिप, इतर सामाजिक संस्थेना अर्थसहाय्य, वैद्दयकीय उपक्रम या द्वारे सेवा दिल्या जातात.

वरती


       






















A